Breaking News

भाजपच्या प्रयत्नाने करंजाडे पाणीप्रश्न होतोय सुरळीत

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या करंजाडे पाणीप्रश्नावर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असुन सद्यस्थितीत पाणीपुरवठा 12.5 एमएलडीपर्यंत होत आहे, तर पुढील दोन ते तीन दिवसांत परिस्थिती पूर्णतः पूर्वपदावर येईल व 14-15 एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती मिळाली. भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांची सिडको पाणीपुरवठा अधिकारी श्री. गायकवाड यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. त्याअनुषंगाने अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी सेक्टर-6 येथे आले व विविध सोसायट्यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे नव्या जलवाहिनीच्या व्हॉल्वसाठी खोदकाम केलेल्या कामाची पाहणी करून लवकरच काम पूर्ण करू, अशी ग्वाही दिली. या वेळी भाजप पदाधिकारी शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, युवा नेते अतिश साबळे, उपाध्यक्ष दिनेश धामनस्कर, सरचिटणीस सचिन कदम, तुलसी गौतम आदी उपस्थित होते. करंजाडे पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी भाजपचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत, पाणीप्रश्न लवकरच निकाली निघेल, असा विश्वास सिडको अधिकारी व भाजप पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply