Breaking News

रायगड एलसीबी अधिकार्‍यांना मालमत्ता हस्तगत पुरस्कार

अलिबाग : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्याकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखे (एलसीबी)तील अधिकारी व अमलदारांना देऊन गौरविण्यात आले. ऑगस्ट ते डिसेंबर 2021 या कालावधीत गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत या करीता महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालकांनी एकूण 11 गुन्ह्यांची पोलीस महासंचालकांकडे शिफारस केली होती. त्यानुसार महासंचाकांनी कोकण परिक्षेत्रातील रायगड जिल्ह्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याकरिता (गुन्हा रजि.नं.09/2021) सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत हा पुरस्कार  रायगड पोलीस दलातील एलसीबीचे निरीक्षक दयानंद गावडे, सहाय्यक निरीक्षक धनंजय पोरे, हवालदार अमोल हंबीर, प्रशांत दबडे यांना जाहीर केला. विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते  दयानंद गावडे, धनंजय पोरे, अमोल हंबीर, प्रशांत दबडे यांना सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Check Also

पनवेलमधील कलाकार भविष्यात अभिनय क्षेत्रात चमकतील -लोकनेते रामशेठ ठाकूर

प्रशिक्षण शिबिराचा शानदार समारोप पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलचे नाव कला, क्रीडा क्षेत्रात गाजत आहे. महापालिकेचा …

Leave a Reply