Breaking News

नागोठणे येथील विद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम

नागोठणे : प्रतिनिधी

जागतिक एड्स निर्मूलन दिनाचे औचित्य साधून रिलायन्स कंपनीचा सीएसआर विभाग, भाएसोचे फार्मसी महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे येथील फार्मसी महाविद्यालयात बुधवारी (दि. 4) दुपारी एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. त्याचे उद्घाटन नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे डॉ. भरत अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. उद्धव कुमार, रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, अपोलो रुग्णालयाचे लोकेश रघुवंशी, रोह्याच्या आधार संस्थेचे कुणाल खुटवाल, मंगेश पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य अनघा सामंत, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अशोक चव्हाण, वैभव नांदगावकर, श्रीमती तनुजा, अमित हारणे, डी. के. मनवर, वरदा कुलकर्णी, रोशन पहेलकर, इशांत वाटवे, मृगांका पाटील, राजेश सुतार, समाधान पाटील आदींसह विद्यार्थी आणि प्राध्यापक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत रांगोळी आणि भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी स्पर्धेतील जुई पाटील, पूजाकुमारी महातो आणि अंकिता गायकवाड तर भित्तीपत्रक स्पर्धेतील अनुवा मुजुमदार, शिवांजली घाडवे आणि पूजा गुर्जर या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात रमेश धनावडे, डॉ. कुमार आणि प्राचार्य अनघा सामंत यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली, तर डॉ. भरत अग्रवाल यांनी चित्रफितीद्वारे एड्स या विषयावर माहिती देताना विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अमित हारणे यांनी आभार मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply