Breaking News

महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज; भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कोरोनाच्या संकटाबरोबरच इतर अनेक प्रश्न डोके वर काढताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधार्‍यांमध्ये बेबनाव आहे. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावताना झोपेच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यातील राजकीय अस्थिरतेवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे. कारण सरकार आता पडेल की नंतर या भीतीने त्यांना झोप येत नसेल, पण तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही.

मागासवर्गीय आयोगाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सात महिन्यांपासून आयोगाचे कार्यालय बंद आहे. मराठा आरक्षणावर सर्वोच्च

न्यायालयात सुनावणी सुरू असताना हे कार्यालय बंद असणे चुकीचे आहे, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.

1 ऑगस्टला अधिकार्‍यांना दूध भेट आंदोलन

दूध दरवाढीसाठी भाजप 1 ऑगस्टला आंदोलन करणार आहे. रासप, रयत क्रांती, रिपाइं या संघटनाही आंदोलनात सहभागी होणार आहेत. आमचे आंदोलन हिंसक नसेल. अधिकार्‍यांना दूध भेट देणे आणि परवानगी मिळाली तर देवाला दूध अर्पण करणे असे आंदोलनाचे स्वरूप असेल, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply