Breaking News

दाखले वाटप शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी (दि. 24) कळंबोली येथील ज्ञानमंदिर स्कूलमध्ये शिबिर झाले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झालेल्या या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील, भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, सरचिटणीस दिलीप बिस्ट, महिला अध्यक्षा मनीषा निकम, महिला मोर्चा उत्तर रायगड सरचिटणीस प्रिया मुकादम, दुर्गा सहानी, केशव यादव, संदीप भगत, भूषण जळे, रवी जाधव, कुमार विद्यानंद, देवीदास खेडकर, रमेश नायर, गौरव नाईक, मयूरी पेरवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमिसाईल, आधारकार्ड, वय व अधिवास, अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply