Breaking News

शिक्षिका चित्रलेखा जाधव यांचा उत्कृष्ट शोध निबंधाबद्दल सन्मान

पनवेल : प्रतिनिधी

राज्यस्तरीय महाराष्ट्र विज्ञान व गणित शिक्षक परिषद 2019 ही इंडियन इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, पुणे तर्फे पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उसर्ली शाळेतील सहशिक्षिका चित्रलेखा जाधव यांच्या शोध निबंधाची उत्कृष्ट शोध निबंध म्हणून निवड झाल्याने त्यांना मंगळवारी पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. गणित व विज्ञान विषयाचे अध्ययन अध्यापन प्रभावी व्हावे आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने यासाठी मराठी विज्ञान परिषद मुंबई  राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करत असते. या अंतर्गतच राज्यस्तरीय महाराष्ट्र  विज्ञान व गणित शिक्षक परिषद 2019 ही इंडियन इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर पुणे येथे ही परिषद  मंगळवारी (दि. 24) आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गणित आणि विज्ञान विषयात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वेगवेगळ्या पद्धती वापरून गणित व विज्ञान अध्ययन अध्यापन अत्यंत सुलभ आणि सोपे करून विद्यार्थ्यांना यातील संकल्पना समजण्यासाठी वेगवेगळ्या कौशल्य पद्धती तंत्रज्ञान याचा वापर करून गुणवत्ता वाढवणे, यासाठी काम करणार्‍या  राज्यातील  विविध शिक्षकांकडून या विषयावरील शोधनिबंध मागवण्यात आले होते. त्यातून निवड केलेल्या शिक्षकांना शोधनिबंधाचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यासाठी बोलावण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील उसर्ली शाळेतील शिक्षिका चित्रलेखा जाधव यांनी  गणित विषयातील संकल्पना समजण्यासाठी नाविन्यपूर्ण विविध उपक्रम ’विद्यार्थी बाल बाजार दिवस’ या संकल्पनेवर केलेले काम सादर केले यामध्ये विद्यार्थ्यांना गणिती व्यवहार सोपा जावा खरेदी-विक्री नफा-तोटा शेकडा नफा तोटा बचत पोस्ट, पोस्टाचे व्यवहार आणि बँकेचे व्यवहार सर्वेक्षण मांडणी संवाद कौशल्य श्रमप्रतिष्ठा गणिती क्रियांची  समकेंद्री मांडणी अमंलबजावणी मांडणी आणि गणित सोडवणे गणितीय संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने सहज सोप्या पद्धतीने समजून घेणे यासाठी एकात्मिक उपक्रम आणि प्रयोग यावर प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या आधारावर शोधनिबंधाचे सादरीकरण केले. त्यांच्या शोधनिबंधाचे लेखन आणि प्रत्यक्ष सादरीकरणाची या परिषदेत उत्कृष्ट शोधनिबंध म्हणून निवड झाली. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावरील शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply