मुरूड : प्रतिनिधी – कोरोनाचा सामना करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग तसेच प्रशासनातील विविध घटक अहोरात्र मेहनत घेत आहेत, मात्र यातील काही योद्द्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले आहे. अशाच प्रकारे मुरूड पोलीस ठाण्यातील शिपाई परेश म्हात्रे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना पनवेलमधील कोविड केअर सेंटर तसेच मरोळ (मुंबई) येथील सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनाला हरवून ते पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले आहेत.
या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार व उपनिरीक्षक मथुरा शेलार यांनी पुष्पगुच्छ देऊन म्हात्रे यांचे स्वागत करून अभिनंदन केले. त्याचप्रमाणे सहकारी असलेले पोलीस हवालदार वाणी, घरत, राहुल अत्तार, साळुंके, नाईक राहुल थळे, आंबेतकर, रोहेकर, साखरकर, लव गोंधळी, शिपाई पाटील, जाधव, वाघमारे, म्हात्रे, झावरे, पवार, वाघमारे, होमगार्ड भंडारी, वाघमारे, देशमुख यांनी पुष्पवर्षाव करून जोरदार स्वागत केले.