
नवी मुंबई : बातमीदार
अयोध्येत राममंदिर उभारल्याने कोरोना नाहीसा होईल का? असा प्रश्न विचारून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना डिवचले होते. याचा समाचार घेण्यासाठी नवी मुंबई भाजपाकडून खा. पवार यांना पत्रे पाठवण्यास सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून खा. पवारांच्या घरी जय श्री राम लिहिलेली 10 लाख पत्र पाठवण्यात येणार आहेत. तर नवी मुंबईतून 20 हजार पत्रे पाठवण्यात येणार आहेत. त्यानुसार नवी मुंबईतून ही पत्रे पाठवण्यास सुरुवात करण्यात आली. या वेळी भाजप युवा मोर्चातर्फे निकेतन पाटील, अॅड. गणेश देशमुख, राज जयसवाल, चारुदत्त ठाणांबिर, राहुल शिंदे, प्रमोद सावंत, अॅड. केतन सावंत, डॅनियल वाघमारे, ओमकार उंबरकर, अमित पांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.