परेश ठाकूर यांनी सहभाग घेऊन केली जनजागृती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल शहर भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्यांतर्गत जल ही जीवन आहे या विषयाला अनुसरून पाण्याची उपयुक्तता, त्याची बचत व संवर्धन कसे करावे याची जाणीव सर्वसामान्य माणसाला करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार शुक्रवारी (दि. 30) कामोठे आणि खांदा कॉलनी येथे जलसंवर्धन रॅॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सहभाग घेऊन जनजागृती केली. पनवेल भारतीय जनता पक्ष, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि सीकेटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवड्यानिमित्त पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आणि उलवे नोड या ठिकाणी परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कामोठे आणि खांदा कॉलनी भाजप मंडल, सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने शुक्रवारी जलसंवर्धन रॅली काढण्यात आली होती. या रॅलीतून जल संवर्धनाचा संदेश नागरिकांना देण्यात आला. या रॅलीत भाजपचे कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, एकनाथ गायकवाड, दिलीप पाटील, माजी नगरसेविका कुसूम म्हात्रे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, प्रदीप भगत, तेजस जाधव, शरद जगताप, सुरेंद्र हळदीलकर, सुमित झुंझारराव, गीता चौधरी, सीकेटी महाविद्यायालयाचे प्राचार्य एस. के. पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते.