नवी मुंबई : बातमीदार
भाजपच्या नेरुळ प्रभाग क्रमांक 93मधील कार्यकर्त्या व समाजसेविका प्रीती भोपी व समाजसेवक चंद्रशेखर भोपी यांनी कोरून काळात जनजागृतीवर भर दिला आहे. माझा विभाग माझा प्रभाग असा उपक्रम राबवत कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी प्रभागातील गरजूंना आधार देत विविध उपक्रम राबवले आहेत. यासाठी थेट भेटींद्वारे संपर्क साधतानाच समाजमाध्यमांचा देखील प्रभावी वापर त्या करत आहेत.
या उपक्रमांत भोपी यांच्याकडून संपूर्ण प्रभागात आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या घरोघरी जाऊन वाटण्यात आल्या आहेत. तर डेंग्यू, मलेरियाची साथ लक्षात घेता पालिकेवर अवलंबून न राहता इमारती, चाळींमध्ये धूर फवारणी केली जात आहे. यासोबत लॉकडाऊनच्या चार महिन्यांत अनेकवेळा सॅनिटायजरने परिसरात फवारणीकरून परिसर स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे. यासोबत गरजूंना संपूर्ण परिसराचे रेशनिंग किट देण्यात आल्याने लॉकडाऊनमध्ये मोठा आधार नेरुळ प्रभाग क्र. 93 मधील नागरिकांना मिळाला आहे. यापुढील काळात देखील रेशन किट वाटप करण्यात येणार आहे. यासोबत घरोघरी जाऊन जनजागृती करताना प्रीती भोपी यांनी मास्क वाटप तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणता आहार घ्यावा याची माहिती देखील प्रभागातील नागरिकांना देत आहेत. नागरिकांना सॅनिटायझरचे वाटप करतानाच शासनाने नमूद केलेले सामाजिक अंतर पाळणे, स्वच्छता राखणे, दररोज वाफ घेणे याबाबत देखील सामाजिक कार्यकर्त्या भोपी मार्गदर्शन करत आहेत. यासोबत गरजूंना उपचारासाठी गरज लागल्यास भाजपचे माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्यामार्फत अनेकांना उपचारांसाठी मदत मिळवून दिली आहे. यासाठी त्यांना भाजपचे कार्यकर्ते देवनाथ म्हात्रे, अक्षय पाटील यांची खंबीर साथ मिळत आहे.