Breaking News

कामोठ्यात आमदार केसरी भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील कामोठे येथे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आणि जय हनुमान कुस्ती संघाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर केसरी भव्य कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत. कामोठे सेक्टर 11 येथील पोलीस ठाण्यासमोरील मैदानात येत्या रविवारी (दि. 19) दुपारी 2 वाजल्यापासून हा थरार रंगणार आहे.
पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विकास घरत आणि भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांनी कुस्त्यांचे सामने आयोजित केले असून या वेळी नामवंत मल्लांमध्ये लढती होतील. विजेत्यांना रोख रकमेचे इनाम दिले जाणार आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply