Breaking News

नगरसेविका नेत्रा पाटील यांच्याकडून खारघरमधील समस्यांची पाहणी

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरमधील प्रभाग क्रमांक 4 येथील समस्यांची नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांसोबत शनिवारी (दि. 30) प्रत्यक्ष पाहणी केली. सेक्टरमधील रहिवाश्यांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सिडको अधिकार्‍यांनाबरोबर घेत पाहणी करण्यात आली.

या वेळी प्रभागातील सेक्टर 19मधील गटारांवरील झाकणे, रस्ते, रस्त्याच्यामधील सिव्हरेज लाईनचे झाकण, फुटपाथवरील अतिक्रमण, सिडकोच्या मालकी हक्काचे काही भूखंडांवरील झालेली घाण व अतिक्रमण यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

या पाहणीच्या वेळी नगरसेवक अभिमन्यू पाटील, सामाजिक कार्यकर्ते  किरण पाटील, सिडकोचे कार्यकारी अभियंता तात्याजी अहिरे, सहाय्यक कार्यकारी अभियंता अमित शेटे व सहाय्यक अभियंता दर्शन कोळी उपस्थित होते.

या पाहणी दौर्‍यात सिडकोचे कार्यकारी अभियंत्यांनी आपल्याबरोबर असलेले अभियंत्यांना सूचना देत हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत अशा सूचना दिल्या. मोकळे भूखंड लवकरच साफ स्वच्छ करून देण्यात येतील, असेदेखील त्यांनी आश्वासित केले.

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांकडे मागणी केली की, त्यांनी आठवड्यातुन एक दिवस देत प्रत्येक सेक्टर निहाय दौरा करून त्या सेक्टरमधील प्रश्न समजून त्यातून मार्ग काढावा. लवकरच सेक्टर 20 व उर्वरित सेक्टरमध्येदेखील अशाचप्रकारे प्रत्यक्ष पाहणी करून सिडकोच्या अखत्यारीत येणारे कामे करून घेऊ, असे नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सांगितले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply