Breaking News

आरोग्य अभियान व कुटूंब कल्याण सोसायटीची सभा

पनवेल : प्रतिनिधी

एकात्मिक आरोग्य अभियान व कुटूंब कल्याण सोसायटी, पनवेल संस्थेच्या नियामक मंडळाची पहिली बैठक शुक्रवारी (दि. 29) महापौर दालनात झाली. आरोग्य सेवेबाबत शासनाने मंजूर केलेले निधी आणि प्रकल्प यावर चर्चा करून त्या विषयास या वेळी मान्यता देण्यात आली.

या सोसायटीच्या अध्यक्षपदाचा  आयुक्त  गणेश देशमुख यांनी कार्यभार स्वीकारल्यावर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी सोसायटीचे सदस्य उपसंचालक आरोग्य सेवा ठाणे यांचे प्रतिनिधी डॉ. सोनावणे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने, जिल्हा ग्रामीण विकास अभिसरण प्रकल्प अधिकारी रणधीर सोमवंशी, महाराष्ट्र राज्य् एडस् नियंत्रण संस्था यांचे प्रतिनिधी संजय माने, जिल्हा इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गुणे, जिल्हा फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रीक्स अ‍ॅण्ड गायपॅकोलॉजिस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक रचनाकार ज्योती कवाडे, सदस्य सचिव डॉ. मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी आनंद गोसावी, जयराम पादीर उपस्थित होते.

दिव्यांग रूग्णांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत मिळणार्‍या दाखल्यासांठी अलिबाग येथे जावे लागते. हा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने लवकरच पनवेलमध्ये दिव्यांगासाठी महाशिबिराचे आयोजन करण्यावरती चर्चा करण्यात आली. या वेळी नव्याने आलेल्या सदस्यांना या सोसायटीच्या नियामक मंडळावर स्वीकृत करण्याच्या ठरावास मान्यता देण्यात आली. कार्यरत असलेले मनुष्यबळ एकात्मिक आरोग्य अभियान व कुटुंब कल्याण सोसायटी यांचेकडे वर्ग करणेबाबतच्या विषयाला मंजूरी देण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2021-22साठी मंजूर प्रकल्प आराखड्याप्रमाणे मान्यता मिळालेल्या निधीचा विषय मंजूर करण्यात आला. सन 2021-22 मंजूर प्रकल्प आराखड्यामध्ये 6 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती व नुतनीकरणासाठी मंजूर झालेल्या निधीप्रमाणे कार्यवाही करणेकामीच्या विषयास मान्यता देण्यात आली.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply