Breaking News

पनवेल तालुक्यात 162 नवे रुग्ण

  दोघांचा मृत्यू; 163 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 29) कोरोनाचे 162 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 163 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 119 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा जणांचा मृत्यू झाला आहे तर 119 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 43 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात 119 नवीन रुग्ण आढळले.  पनवेल महापालिका क्षेत्रात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. कामोठे सेक्टर 34 रविरत्न कोर्नर आणि नवीन पनवेल सेक्टर 8 मधील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 15 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1107 झाली आहे. कामोठेमध्ये 31 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1321  झाली आहे. खारघरमध्ये 27  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 1227 झाली आहे.

नवीन पनवेलमध्ये 27  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1069 झाली आहे. पनवेलमध्ये 12 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1232 झाली आहे. तळोजामध्ये सात नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 387  झाली आहे.  तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल 33, नवीन पनवेल 32, कळंबोली  15, कामोठे 17, खारघर 19,  तळोजे तीन असा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 6343 रुग्ण झाले असून 4737 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.68 टक्के आहे. 1452 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 154 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 43 रुग्ण आढळल्याने 2009 झाली असून 44 रुग्ण बरे झाल्याने एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1566 झाली आहे. 44 जणांचा मृत्यू झाला आहे.

कर्जत तालुक्यात 18 जणांना लागण

कर्जत : कर्जत तालुक्यात बुधवारी कोरोनाचे 18 रुग्ण आढळले असून एका 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तालुक्यात 472 कोरोना रुग्ण आढळले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 354 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये 12 रुग्ण कर्जत नगरपरिषद हद्दीतील असून सहा रुग्ण तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत.

महाडमध्ये 31 नवीन पॉझिटिव्ह

महाड : महाडमध्ये बुधवारी नव्याने 31 रुग्ण आढळले असून दुसरीकडे 23 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये नवेनगर चार, नांगलवाडी तीन, पोलीस लाईन तीन, बिरवाडी तीन, लाडवली दोन, सरेकरआळी दोन, प्रभातकॉलनी, फ्लॉवरव्हॅली कोटेश्वरीतळे, साईश्रध्दा अपार्टमेंट, केशरी आंगण, जव्हाहर कॉलनी, झोलाई हाऊस, काकरतळे, तांबडभुवन, किंजळघर, विश्वकर्मी मंदीर नवेनगर, सोनारवाडी, चोचिंदे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. महाड मध्ये 134 उपचार घेत असुन, 237 रुग्ण बरे झाले आहेत तर अजुन पर्यंत एकुण 392 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

नागोठणेसह विभागात 21 नवे बाधित

नागोठणे : कोरोनाच्या रुग्णांची साखळी अद्यापही तुटली जात नसून शहरासह विभागात बुधवारी नव्याने 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरात चार, तर कडसुरे येथे तीन आणि वणी येथे एक असे आठ पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी दिली. विभागात पेण तालुकांतर्गत असणार्‍या गावांमध्ये आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 इतकी असून त्यात शिहू चार, बेणसेवाडी दोन, कोलेटी एक, रिलायन्स निवासीसंकुल तीन, जांभूळटेप दोन आणि बेणसे येथे एक रुग्णाचा समावेश आहे.

नवी मुंबईत 375 नव्या रुग्णांची नोंद

नवी मुंबई : नवी मुंबईत बुधवारी 375 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला नवी मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 हजार 627 तर 311 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या नऊ हजार 754 झाली आहे. बुधवारी पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 407 झाली आहे.  नवी मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 67 टक्क्यांवर स्थिरावला असला सद्य स्थितीत नवी मुंबईत चार हजार 466 रुग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 88, नेरुळ 65, वाशी 31, तुर्भे 21, कोपरखैरणे 61, घणसोली 57, ऐरोली 47,  दिघा 5 असा समावेश आहे.

उरण तालुक्यात 18 जणांना संसर्ग

दोघांचा मृत्यू; नऊ रुग्णांना डिस्चार्ज

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह 18 रुग्ण आढळले असून दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये नागाव, पाणजे, नवघर कणकेश्वरी मंदिराजवळ, चिरनेर, धुतुम, फुंडे ग्रामपंचायत जवळ, एकदंत अपार्टमेंट उरण, मुळेखंड, आवरे, जसखार, नवघर, उरण-करंजा रोड, जांभूळपाडा उरण, सीआयएसएफ कॉलनी ओएनजीसी, वशेणी, आवरे, जसखार, जुई येथे प्रत्येकी एक असे एकूण 18 रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जसखार तीन, जेएनपीटी दोन, जुई, वशेणी, वेश्वी, भेंडखळ येथे प्रत्येकी एक एकूण नऊ रुग्णांचा समावेश आहे. तर वशेणी व करंजा येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply