नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाला देशात प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. 22) संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. अनेकांनी पंतप्रधानांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून, यात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्र होत असून, भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आपल्या घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी हा यामागचा उद्देश आहे. अत्यावश्यक सेवांना या जनता कर्फ्यूमधून वगळण्यात आले आहे.
जागतिक महामारी असलेल्या कोरोनामुळे निश्चिंत होण्याची ही वेळ नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहणे आवश्यक आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले आहे.
Check Also
अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….
काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …
RamPrahar – The Panvel Daily Paper