Breaking News

बौद्ध लेण्यांचे संवर्धन करा; बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अलिबाग ः प्रतिनिधी

महाराष्ट्रातील ऐतिहासिक बौद्ध स्तुपे आणि लेण्यांचे संवर्धन करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 5) बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे (बीआयएन) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर 12 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयांसामोर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 30 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सर्व विभागीय पुरातत्त्व कार्यालयांवर मोर्चा नेण्यात येणार आहे. गौतम बुद्धांची जन्म व कर्मभूमी म्हणून भारताची जगात ओळख आहे. सम्राट अशोक तसेच अन्य बौद्ध राजांनी बौद्ध स्तुपे व विहार बांधली. बुलडाणा जिल्ह्यातील भोन, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, नागपूर जिल्ह्यातील अडम, अकोला जिल्ह्यातील पातूर व बाळापूर, नाशिक येथील त्रिरश्मी, पुणे जिल्ह्यातील कार्ले, पालघर जिल्ह्यातील सोपारा या सर्व लेण्या आजही दुर्लक्षित आहेत. या लेण्यांचे संवर्धन करण्यात यावे तसेच त्यांना पर्यटनाचा जागतिक दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहेे. या मागणीसाठी बीआयएनतर्फे सोमवारी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात बुद्धिस्ट इंटरनॅशनल रायगडचे अध्यक्ष सुधीर शिंदे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल रायगडचे कार्याध्यक्ष नितीन गायकवाड, बहुजन समाज क्रांती मोर्चा रायगडचे दादासाहेब खंदारे, बुद्धिस्ट इंटरनॅशनलचे अलिबाग तालुका अध्यक्ष धर्मसेन डवले, बुद्धिस्ट इंटरनॅशनलचे प्रभारी दीपक निकोसे, बुद्धिस्ट इंटरनॅशनलचे प्रभारी बी. व्ही. मेश्राम, महिला संघाच्या सुजाता कासे, म्हसळा तालुका अध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे मैनुद्दीन दळवी, सूर्यकांत कासे, समाज क्रांती संघटनेचे अध्यक्ष बी. जे. पाटील आदी सहभागी झाले होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply