Breaking News

माणगाव नगरीत घरफोडी सुरूच

नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव नगरीत घरफोडीचे धाडसत्र सुरूच आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दाराचे  कोणत्यातरी हत्याराने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरफोडी केली. रोख रक्कम 15  हजार रुपये चोरून तो फरार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) घडली. सायंकाळी 4 वाजता ते मंगळवारी (दि. 24 ) सकाळी 7.20 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या घरामध्ये तुलसी वृंदावन अपार्टमेंट बी विंग रूम नं.1 पहिल्या मजल्यावर माणगाव येथे घडली. याबाबतची फिर्याद राकेश लिंबाजी पिंगळा (वय-40) सध्या रा. तुलसी वृंदावन अपार्टमेंट बी विंग रूम नं.1 माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील अज्ञात  चोरट्याने फिर्यादी यांच्या राहते  बंद घराच्या दाराचे  कोणत्यातरी  हत्याराने कांडीकोयंडा तोडून त्यावाटे घरात प्रवेश करून घरफोडी चोरी करून घरातील 500 रुपये दराच्या 20 नोटा किंमत 10 हजार रुपये,100 रुपये दराच्या 25 नोटा किंमत 2500 रुपये,50 रुपये दराच्या 50 नोटा किंमत 2500 रुपये असे एकूण 15 हजार रुपये रोख रक्कम चोरून तो पसार झाला आहे. या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात भादवि संहिता कलम 454,457,380 प्रमाणे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक के.डी.जाधव या करीत आहेत.

बंद घरांकडे चोरट्यांचे लक्ष

दरम्यान, घरफोडीच्या घटना या उन्हाळी सुट्टीत दरवर्षी घडत आहेत. सतत बंद घरांची होणारी घरफोडी याकडे नागरिकांनी लक्ष देऊन शक्यतो आपण घरातील सर्वजण एकाच वेळी बाहेर जाऊ नये. गेल्यास शेजार्‍यांना घरावर लक्ष ठेवण्याची विनंती करावी किंवा एखादा सेक्युरिटी गार्ड यांना खास लक्ष ठेवण्यास सांगावे असे आवाहन माणगाव पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply