Breaking News

तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; तीन कर्मचार्यांना लागण

खोपोली ः बातमीदार – खालापूर तहसील कार्यालयातील तीन कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात  सापडल्याने इतर कर्मचारी भीतीच्या छायेत आहेत. शनिवारी महसूल दिनानिमित्त खालापूर तहसील कार्यालयातर्फे रक्तदान शिबिर आणि कर्मचार्‍यांच्या अँटीजन तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची उपस्थिती होती. 41 कर्मचार्‍यांची अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन पुरुष आणि एक महिला कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.

 या तिघांना कोणतीच लक्षणे नसल्यामुळे दररोज कामावर येत होते. त्यामुळे तिघे कोरोनाबाधित असल्याचे उघड झाल्याने सहकारी कर्मचार्‍यांची चिंता वाढली आहे. बाधित दोन पुरुष कर्मचारी खालापुरात सुरू झालेल्या कोविड केंद्रात दाखल झाले असून, महिला कर्मचारी होम क्वारंटाइन आहे. अँटीजन तपासणीशिवाय लॅबकडूनदेखील तपासणी करण्यात येणार आहे, तसेच तहसील कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी सांगितले.

Check Also

खारघर महिला मोर्चा पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान

खारघर ः रामप्रहर वृत्त भाजप महिला मोर्चा खारघरच्या वतीने येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये गोव्याचे …

Leave a Reply