

पनवेल : विठ्ठलाच्या जयघोषात आणि तुकोबाच्या सुरेल अभंगात पनवेल मार्केटमध्ये तुकाराम बीजोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तुकाराम महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली होती.