पनवेल : रामप्रहर वृत्त
संभाजीनगर येथे वंजारी सेवा संघाची कार्यकारिणी शनिवारी (दि. 1) घोषित करण्यात आली. वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष माननीय अनिल फड यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बबन बारगजे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
आज प्रदेश अध्यक्ष अनिल फड, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. खुशाल मुंढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व कार्यकारी मंडळाच्या चर्चेनुसार वंजारी सेवा संघ (असोसिएशन)ची प्रदेश कार्यकारिणी घोषणा करण्यात आली.
या कार्यकारिणीमध्ये रायगड मधील माणगाव येथे कार्यरत असलेले शिक्षक परिषदेचे रविकिरण पालवे यांची प्रसिद्धीप्रमुख व भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच माजी मंत्री पंकजाताई मुंडे व भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रीतम मुंडे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन केले आहे.