पुणे : मुंबईसह कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रात येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 6 ऑगस्टपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, मुंबई, ठाणे व उत्तर महाराष्ट्रात याचा जास्त प्रभाव जाणवेल. 4 ऑगस्ट रोजी उत्तर बंगालच्या उपसागरात मान्सूनचा अधिक प्रभाव आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याच्या शक्यतेमुळे 3 ते 6 ऑगस्टदरम्यान मुंबईसह मध्य महाराष्ट्रात घाट परिसरासह कोकणात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्येही अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी केले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …