पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे श्रीमद्भगवदगीता पाठ महायज्ञ उत्साहात झाला. धार्मिक वातावरणात गीतेच्या श्लोकांचे पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी, देश, राज्य व समाजाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या संस्कारमय कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या महायज्ञाचे आयोजन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
बुधवारी सकाळी श्री. विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे श्रीमद् भगवद् गीता पाठ महायज्ञ संपन्न झाले. तसेच एकाच वेळी 200 हुन अधिक जणांनी एकत्र येऊन श्रीमत भगवद गीतेतील सर्व श्लोकांचे लयबद्ध पठण करून गीतेच्या ज्ञानाचा दिव्य अनुभव घेतला.
सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गीतेच्या श्लोकांमध्ये सहभाग नोंदवला. यज्ञस्थळी मंत्रोच्चार आणि वेदघोष यामुळे परिसरात एक पवित्र व अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, गुरुकुलम न्यास अध्यक्ष मंजिरी फडके, संस्कार भारतीच्या जुईली चव्हाण, संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा मोर्चा यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper