Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विक्रम; सर्वाधिक काळ गैरकाँग्रेसी पीएम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपचे सर्वांत प्रदीर्घ काळ असलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी विक्रम केला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडीत काढला. यासोबतच सर्वांत जास्त काळापर्यंत पंतप्रधान पदावर असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणूनदेखील पंतप्रधान मोदी यांनी आपली मोहोर देशात उमटवली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या अगोदर अटलबिहारी वाजपेयी हे सर्वांत प्रदीर्घ काळ गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. सलग दोन हजार 256 दिवस वाजपेयी पंतप्रधान पदावर होते. 19 मार्च 1998 रोजी वाजपेयी पंतप्रधान बनलेे. ते सलग 22 मे 2004पर्यंत पंतप्रधानपदी होते. त्यांचा पहिला कार्यकाळ 19 मार्च 1998 ते 13 ऑक्टोबर 1999पर्यंत, तर दुसरा कार्यकाळ 13 ऑक्टोबर ते 22 मे 2004पर्यंत होता.
सद्यस्थितीस देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असलेले नरेंद्र मोदी हे दोन हजार 260 दिवसांपासून आजतागायत या पदावर कायम आहेत. यामुळे सर्वांत जास्त काळ पंतप्रधान पदावर राहिलले पहिले गैरकाँग्रेसी व भाजप नेता म्हणून त्यांच्या नावे विक्रम झाला आहे.
नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ 26 मे 2014पासून सुरू झाला असून, तो अद्यापही सुरूच आहे. 2014मध्ये भाजप प्रचंड बहुमत मिळवत देशात सत्तेवर आला होता. त्यानंतर 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांचा पहिला कार्यकाळ 2019मध्ये संपला होता. पुन्हा एकदा 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवत सत्ता मिळवली आणि नरेंद्र मोदी सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले. आता त्यांनी विक्रम केला आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply