Breaking News

भाजपतर्फे कोरोना योद्ध्यांना हेल्थ पॉलिसीचे वितरण

नवी मुंबई : बातमीदार

भारतीय जनता पक्ष, ऐरोली, प्रभाग क्र 22मध्ये समाजसेवक राजेश मढवी व समाजसेविका रेश्मा मढवी यांच्या वतीने दिवा गावातील 20 कोरोना योद्ध्यांना कोरोना आरोग्य विम्याचे वितरण करण्यात आले. सामाजिक स्तरावर ही प्रथमच कोरोना आरोग्य विमा देण्यात आला आहे. या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

सध्या कोरोनाच्या संकटकाळात समाजात अनेक उपक्रम राबविले जात आहे. गरजू, विभागातील नागरिक व निराधारांना विविध प्रकारची मदत केली जात आहे. जनजागृती केली जात आहे. याच काळात समाजात झटत असणार्‍या व आपल्या जीवाची पर्वा न करणार्‍या कोरोना योद्ध्यांना विम्याचे  संरक्षण देऊन वेगळाच उपक्रम राजेश मढवी यांनी दिवा गावात राबविला. प्रत्येकी एक लाख रुपयांचा विमा 20 कोरोना योद्ध्यांचा उतरवण्यात आला. माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी पालिकेने केलेल्या आवाहनाला अनुसरून रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले. या कार्यक्रमास समाजसेवक दिपक पाटील, चिंतामणी केणी, भरत मढवी, महेश मढवी, हरीचंद्र  मढवी, अरुण पडते आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply