Breaking News

राज्यात कोसळधार !

जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पाणीच पाणी; जनजीवन विस्कळीत

मुंबई : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवारी (दि. 13)देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले.
राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी पाणी शिरले होते. कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त दिसून आला. याचा फटका कर्मचारी, विद्यार्थीवर्गाला बसला.
पावसाची संततधार मुंबईत सुरूच असल्याने चेंबूरसह काही भागांत पाणी साचले. शेल कॉलनी, सावंत बाजार परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले होते. दरम्यान, पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झाला. पावसामुळे लोकल विलंबाने धावत होत्या, तर रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या.
वसईत दरड कोसळून दोघांचा मृत्यू
वसई : राजवली वाघरळपाडा येथे बुधवारी (दि. 13) सकाळी अचानक डोंगराचा भाग एका घरावर कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मृतांमध्ये अमित ठाकूर (35) आणि रोशनी ठाकूर (14) यांचा समावेश आहे, तर वंदना अमित ठाकूर (33) आणि ओम ठाकूर (10) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply