भाजप महिला मोर्चाचा उपक्रम
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुका भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालयांत जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला. या उपक्रमाबद्दल शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी आनंद व्यक्त केला.
भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांत जाऊन महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रक्षाबंधन साजरा करीत आहेत. अशाच प्रकारे कर्जत तालुक्यात महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, जिल्हा महिला मोर्चा सोशल मीडिया संयोजक गायत्री परांजपे, कर्जत शहर अध्यक्ष सरस्वती चौधरी, माजी नगरसेविका बिनीता घुमरे, तसेच सुषमा ढाकणे, लीना गांगल आदींनी तहसील, नगर परिषद, सरकारी दवाखाना, पोलीस ठाणे येथे जाऊन तेथे काम करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांना राखी बांधून भावा-बहिणीचे नाते निर्माण केले.
पालिकेत काम करणार्या सफाई कामगारांनाही राख्या बांधण्यात आल्या. त्याचवेळी रस्त्यावर भाजी विकणारे विक्रेते आणि मेडिकल चालक यांना कोविड गौरव पत्रक देऊन रक्षाबंधन साजरे केले गेले. कर्जत भाजप महिला मोर्चाच्या या उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे.