एकाचा मृत्यू; 153 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 7) कोरोनाचे 217 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभरात 186 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 102 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 31 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 51 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कळंबोली सेक्टर 3 येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल नऊ, नवीन पनवेल 21, खांदा कॉलनी 23, कळंबोली 43, कामोठे 49, खारघर 30, तळोजा 11 अशी आकडेवारी आहे. तर बरे झालेल्या रुग्णसंख्येत पनवेल 21, नवीन पनवेल 13, कळंबोलीत 18, कामोठे 22, खारघर 22, तळोजा येथे सहा यांचा समावेश आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण 7717 रुग्ण झाले असून 6073 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 177 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.70 टक्के आहे. 1467 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 31 रुग्ण आढळले आहेत. तर 51 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नवी मुंबईत 649 जण कोरोनामुक्त; 343 नव्या रुग्णांची नोंद
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत शुक्रवारी तब्बल 649 जण कोरोनामुक्त झाले तर 343 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर नवी मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 17 हजार 694 तर बरे झालेल्यांची 13 हजार 552 झाली आहे. शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 454 झाली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 688 रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी दिवसभरात एक हजार 938 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून, एकूण रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या 29 हजार 614 झाली आहे. तर एकूण आरटीपीसीएस टेस्ट केलेल्यांची संख्या 36 हजार 112 झाली असून कोविड टेस्ट केलेल्यांची एकूण संख्या 65 हजार 726 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 67, नेरुळ 94, वाशी 36, तुर्भे 25, कोपरखैरणे 45, घणसोली 48, ऐरोली 45, दिघा 16 यांचा समावेश आहे.
उरण तालुक्यात सात जणांना लागण; एकाचा मृत्यू
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात शुक्रवारी (दि. 7) कोरोना पॉझिटिव्ह सात रुग्ण आढळले, एक रुग्णांचा मृत्यू व 13 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये चीर्ले, सुरुंगपाडा, कळंबूसरे, मोरा रोड उरण, जासई, नागाव, धुतुम येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये करंजा दोन, दिघोडे दोन, सोनारी दोन, उरण दोन, डोंगरी, मोरा कोळीवाडा, मुळेखंड, जांभूळपाडा, सीआयएसएफ ओएनजीसी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर धुतुम येथे एक रुग्णाचा मृत्यु झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 959 झाली आहे. त्यातील 799 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 125 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
कर्जत तालुक्यात नऊ नवे पॉझिटिव्ह
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात शुक्रवारी पोलीस ठाण्यामध्ये परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकासह नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा 582 वर जाऊन पोहचला आहे. तर आतापर्यंत 477 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये कर्जत पोलीस ठाण्यामध्ये, दहिवली येथील विठ्ठल मंदिर परिसरात, भिसेगाव परिसरात, कडाव गावानजीक, गौळवाडी, भिसेगाव, सुर्यमल्हार इमारत, कर्जत मधील राज टॉवर इमारत, नेरळ जुन्या बाजारपेठेत येथे प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.