पनवेल : वार्ताहर – गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची वृक्ष उन्मळून पडले होते. त्याचा फटका विद्युत वाहिन्यांना बसून प्रभाग क्र. 18सह पनवेल परिसरातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या वेळी भाजप नगरसेवक व भाजप युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या साथीने कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रभागासह परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत केला.
शहरातील अनेक ठिकाणी झाडे पडल्याची त्याचप्रमाणे डायमंड पार्क येथील ट्रान्सफॉर्मर पोल वादळामुळे पूर्णपणे उन्मळून खाली पडल्याची माहिती नगरसेवक विक्रांत पाटील यांना मिळताच त्यांनी वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा करून या ठिकाणी स्वतः सात-आठ तास वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या साथीने कार्यकर्त्यांच्या मदतीने विद्युत पुरवठा सुरळीत करून घेतला. यासंदर्भात त्यांनी प्रभागातील नागरिकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासंदर्भात माहितीसुद्धा वेळोवेळी दिल्याने नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला. याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.