Breaking News

‘नेरूळमधील तानाजी मालुसरे क्रीडांगणात कृत्रिम तलाव बनवा’

नवी मुंबई : बातमीदार

नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनविण्याची मागणी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी ‘ब’प्रभाग समिती सदस्य   मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

सध्या कोरोना काळ सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाची आकडेवारी दररोज वाढत असल्याचे आपणास माहिती आहेच. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी जुईनगर येथील चिंचोली तलाव व पामबीच मार्गावरील तलावात जात असतात. नेरूळ सेक्टर सहा परिसरात महानगरपालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या क्रिडांगणात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तातडीने बनविणे आवश्यक आहे. एका दिवसात कृत्रिम तलावाची निर्मिती करणे सहज  शक्य आहे. ठेकेदारांनी आजवर महापालिकेत कामे करून कोट्यवधी रूपये कमविले आहेत. या मैदानात कृत्रिम तलाव बनल्यास नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील घरगुती गणेश व सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन येथे करणे शक्य होईल आणि जुईनगर येथील चिंचोली तलावावर तसेच पामबीच तलावावरील गर्दी कमी होईल, असे भाजपचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तातडीने बनविणे आवश्यक आहे. आम्ही आजच नाही तर गेल्या काही वर्षापासून या क्रिडांगणावर गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कृत्रिम तलावाची मागणी करत आहोत. आता  कोरोना टाळण्यासाठी आणि नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील गणेश मूर्तीचे स्थानिक परिसरात विर्सजन करण्यासाठी लवकरात लवकर तानाजी मालुसरे क्रिडांगणावर कृत्रत्रिम तलाव बनविण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी भाजपचे मेहेर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply