Breaking News

निराधार महिलेला स्त्री शक्ती फाऊंडेशनची मदत

पनवेल : वार्ताहर

स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या पुढाकाराने एका निराधार बेवारस महिलेला तत्काळ मदत मिळाली आहे. तिला त्यानंतर ठाणे येथील मनोरूग्णांच्या दवाखान्यातही दाखल केले आहे. ज्येष्ठ नागरिक संघ कळंबोलीचे सहसचिव पी. एस. हातेकर यांनी स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विजया कदम यांना भ्रमणध्वनी करून कळविले की, एक अनोळखी स्त्री कळंबोली पोस्ट ऑफिसच्या समोर विवस्त्र अवस्थेत पडलेली आहे. तिला तत्काळ मदत करण्याची गरज आहे. त्यावर समाजसेविका विजया कदम यांनी महापालिका, पोलीस यांच्याकडे मदत मागितली होती. इमरान रशिद घनकर यांनी मदत केली. अमरजीत सिंग आणि गुरुद्वारपंजाबी सहकार्यानी भेट दिली. पालिकेत विनया म्हात्रे या उपायुक्त जमिर लेंगरेकर यांच्या आदेशाने सर्व हालचाली केल्या. पुढे तिला ठाणे येथील मनोरूग्ण रूग्णालयात पाठविले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply