Breaking News

स्वरमंदिर प्रतिष्ठानच्या मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध

पनवेल ः रामप्रहर वृत्त

स्वरमंदीर प्रतिष्ठानच्या वतीने गुरु पोर्णिमा उत्सव 2019चे आयोजन करण्यात आले असून, यंदाचे हे या प्रतिष्ठानचे 39वे वर्ष आहे. त्याअंतर्गत शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुमन गायन वादनाच्या बहादरार मैफीलीचे आयोजन येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 12) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाला बनारस घराण्याचे तबला अलंकार गायन विशारद संजय तुपे, पनवेलमधील नामवंत तबला वादक संतोष खरे, पुजारी, विनोद तोडेकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे मुख्य विश्वस्थ पंडीत बाबादास तुपे गुरूजी यांच्या शिष्यगणांच शास्ञीय, उप शास्ञीय व सुगम संगीताच गायन झाल. रविंद्र जाधव , प्रेम पाटील, प्राजक्ता जाधव, श्रध्दा माळी यांनी शास्ञीय गायन केल. उपविश्वस्थ उदेश उमप यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. तसेच विश्वस्थ जितेंद्र तुपे यांनी रंगमंचावरील वादकांची व कार्यक्रमाची रूपरेषा पार पाडली. छोट्या चिमुकल्यांनी सुंदर गायन करून सर्वांची मने जिंकली. अशा पध्दतीने कालचा गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने दिमाखात झाला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply