Breaking News

‘मी समलैंगिक नाही’

सिडनी : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जेम्स फॉकनर याने आपण समलैंगिक नसल्याचा खुलासा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केला आहे. सोमवारी ‘विथ बॉयफ्रेंड’ अशा कॅप्शनसह फोटो इन्स्टाग्रामवर फॉकनरने पोस्ट केल्यानंतर तो समलैंगिक असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.

जेम्स फॉकनरने त्याची आई आणि घनिष्ठ मित्रासोबत सोमवारी संध्याकाळी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ‘बॉयफ्रेंड (बेस्ट फ्रेन्ड) आणि आईसोबत बर्थ डे डिनर’ अशा कॅप्शनसह हा फोटो पोस्ट केल्यामुळे फॉकनर समलैंगिक असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. अनेक समलैंगिकांनी लैंगिकतेबद्दल मोकळेपणे बोलल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले होते; तर अनेकांनी त्याच्या या धाडसाचे कौतुक केले होते. रात्रभर ट्विटरवर, इन्स्टाग्रामवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत होता, पण अखेर सकाळी या चर्चेला खुद्द फॉकनरनेच पूर्णविराम दिला.

‘माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला आहे. मी काही समलैंगिक नाही. मला समलैंगिकांबद्दल प्रचंड सहानुभूती आहे, मात्र मी काही समलैंगिक नाही. ज्याच्यासोबत फोटो टाकला आहे तो एक खूप चांगला मित्र आहे. आम्ही पाच वर्षांपासून एकाच घरात राहत आहोत, असे फॉकनरने नमूद केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply