Breaking News

पनवेलमध्ये 239 नवे पॉझिटिव्ह

नऊ जणांचा मृत्यू; 179 रुग्णांची संसर्गावर मात

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 12) कोरोनाचे 239 नवीन रुग्ण आढळले असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 179 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 189 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, आठ जणांचा मृत्यू झाला. 145 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 50 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला. 34 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल बावन बंगला, नवीन पनवेल येथील सेक्टर 17 बिल्डींग नं. 11, सेक्टर 2 मिलन सोसायटी, खांदा कॉलनी ओम श्री समर्थ सोसायटी, कळंबोली येथील सेक्टर 4 कैलास कॉम्प्लेक्स, सेक्टर 1 साई पुजा बिल्डिंग, खारघर सेक्टर 10 साई प्रसाद रेसिडन्सी येथील प्रत्येकी एकाचा मृत्यूचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. तर नवीन पनवेल सेक्टर 6 येथील एकाचा मृत्यूची नोंद झाली. तर आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 25 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1578 झाली आहे. कामोठेमध्ये 54 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1839 झाली आहे. खारघरमध्ये 31 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 1676 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 49 नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 1527 झाली आहे. पनवेलमध्ये 19 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1485 झाली आहे. तळोजामध्ये 11 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 511 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 8616 रुग्ण झाले असून 6764 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.51 टक्के आहे. 1647 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 205 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात गव्हाण येथील एका व्यक्तीचा मृत्यूचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे नऊ, सुकापूर पाच, करंजाडे चार, वारदोली तीन, देवद तीन, वावंजे, बारवई, केवाळे, न्हावा, विचुंबे येथे प्रत्येकी दोन, तसेच आकुर्ली, चिंध्रण, आपटे, आरीवली, बेलवली, भिंगारवाडी, कोन, कोपर-गव्हाण, कोप्रोली, दुंदरे, भिंगार, नांदगाव, नेवाळी, पारगांव, शेलघर, वडघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2544 झाली असून 2135 जणांनी कोरोनावर मात केली असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत 407 जणांना संसर्ग

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत बुधवारी 407 जणांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला तर 312 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बधितांची एकूण संख्या 19 हजार 440 तर बरे झालेल्यांची 15 हजार 485 झाली आहे. दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 486 झाली आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत तीन हजार 469 रुग्ण उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 61, नेरुळ 76  वाशी 29, तुर्भे 52, कोपरखैरणे 77, घणसोली 47, ऐरोली 50,  दिघा 15 असा समावेश आहे.

उरण तालुक्यात 14 नवे रुग्ण

चौघांचा मृत्यू; दोन जणांना डिस्चार्ज

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह 14 रुग्ण आढळले, चार रुग्णांचा मृत्यू व दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये वेश्वी, समर्थ रामदास मंदिर जवळ दिघोडे, सिंडीकेट बँक, झिंगरा गल्ली जासई, चिन्मय गावरान सोसा, जेएनपीटी टाऊनशिप, प्रायमरी शाळा वशेणी, पोलीस स्टेशन, काठे आळी केगाव अवेडा, आवरे, साई बालाजी नगर नागाव, म्हातवली, ओमकार कॉलनी कुंभारवाडा, नागाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी येथील दोघांचा समावेश आहे. तर नागाव, दिघोडे, धुतुम व कळंबूसरे येथे प्रत्येकी एक असे एकूण चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1039 झाली आहे. त्यातील 847  बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 148 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 44 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे  यांनी दिली.       

पोलादपुरातील रुग्ण शंभरीच्या उंबरठ्यावर

पोलादपूर : प्रतिनिधी

पोलादपूर तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या मंदावली असून मंगळवारी आणि बुधवारी दोन कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कोरोना मृत्यूची संख्या 11 झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी दिली. दरम्यान, दोन जणांची कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 99 झाली आहे. सोमवारी पोलादपूर शहरातील जयहनुमानगर, पोलीस, तसेच क्षेत्रपाळ येथील प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यानंतर तालुका कृषी कार्यालयामधील दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकूण कोरोना रूग्णांची संख्या 99 झाली. सध्या 11 पॉझिटीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. 77 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कर्जतमध्ये 13 नवे कोरोनाग्रस्त

कर्जत : कर्जत तालुक्यात बुधवारी 13 नवीन कोरोना बाधित आढळले आहे. प्रांत कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने 12 व 13 ऑगस्ट रोजी कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत कर्जत तालुक्यात 624 रुग्ण सापडले असून 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये कर्जतमध्ये चार, पळसदरी दोन, दहिवली, तिवरे, नेरळ, तमनाथ, आकुर्ले, तिघर, मोठे वेणगाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

महाडमध्ये 12 नव्या रुग्णांची नोंद

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यात बुधवारी कोरोनाचे नव्याने 12 रुग्ण आढळून आले असुन, एकाचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे महाडमध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे.आढळलेल्या रुग्णांमध्ये तुडील सहा, शारदा कॉम्प्लेक्स बिरवाडी तीन, प्रभात कॉलनी, जुई, पिंटळवाडी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर अप्पर तुडील येथील 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण उपचार घेऊन बरा झाला आहे. महाडमध्ये एकुण 127 रुग्ण उपचार घेत असून, 445 रुग्ण बरे झाले आहेत, तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे. महाडमध्ये आतापर्यंत एकुण 603 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

रोहा तालुक्यात 23 जणांना लागण

रोहे : प्रतिनिधी

रोहा तालुक्यात बुधवारी 23 कोरोना बाधित व्यक्ती आढळले आहेत. त्यामुळे रोहा तालुक्याची कोरोना संख्या 858वर गेली आहे. तर 25 व्यक्तीने कोरोनावर मात करीत बरे होत घरी गेले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करणार्‍या व्यक्तींची संख्या 577 एवढी झाली आहे. आतापर्यंत 19 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच तालुक्यात 262 रुग्ण उपचार घेत आहेत. रोहा शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तालुक्याची ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरात सहा व ग्रामीण भागात 17 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात 14 पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. तर 60 वर्षावरील तीन व्यक्ती व 14 वर्षीय मुलीचा यामध्ये समावेश आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply