Breaking News

मोहोपाड्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण अधिक

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्ग कधी, कुठे, कसे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रसायनी परीसरातील वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे. यातच परीसरातील इतर भागापेक्षा कोरोनाचे रुग्ण वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत वाढतच असल्याने चिंतेची बाब असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास 72 टक्के आहे. ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांची आकडेवारीचा आलेख दिलासादायक असल्याचे दिसून येत आहे.

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील कोरोनाग्रस्तांची 14 ऑगस्ट अखेर झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. चांभार्ली ग्रामपंचायत हद्दीत एकूण 29 कोरोनाग्रस्त, बरे झालेले 21, मयत एक, उपचार सात जणांवर सुरू आहे. लोधिवली ग्रामपंचायत हद्दीत एकूण 45 कोरोनाबाधित, बरे झालेले 35, उपचार सुरू असलेले 10 जणांवर सुरू आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत एकूण 266, एकूण बरे 200, मयत पाच, उपचार सुरू असलेले 61 जणांवर सुरू आहे. रसायनी परीसरातील मोहोपाडा बाजारपेठेत आसपासच्या परिसरातील काही नागरिक खरेदीसाठी येत असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होवून सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत कोरोनासंसर्गाचा आलेख सप्टेंबर महिन्यातपर्यंत दिलासादायक राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तरीही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता आपली व आपल्या कुटुंबाची खबरदारी घ्यावी असे आवाहन होत आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply