चिरनेर : रामप्रहर वृत्त
अवघ्या महाराष्ट्रातील आणि हिंदू धर्मियांचा सर्वाधिक लोकप्रिय भावभक्तीच्या श्रध्देचा आणि जिव्हाळयाचा असा गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. गणेशोत्सवही मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेसमाज माध्यमांवर येणार्या नवनविन आणि विविध पध्दतीच्या गणेशमुर्ती पाहून प्रत्येक कारखान्यात विविध रूपातील मुर्ती साकारण्यात आल्या आहेत. दरम्यान चिरनेर कलानगर येथील घराणी गणेशमुर्तीच्या व्यवसायात सक्रिय असून, त्यांच्या नवव्या दहाव्या पिढया यशस्वीपणे सदर व्यवसाय चालवित असल्या तरी येथील गणेशमुर्ती घडविणारे मुर्तीकार यंदाच्या कोरोनाच्या संकटाच्या सावटाखाली वावरत आहेत. माती कामातून मुर्तीकला साकारणे ही या समाजाला मिळालेली दैवी देणगी आहे. कुंभाराचे स्थान समाजासाठी खूप महत्वाचे आहे. परंतू निराकारातून आकार देणार्या कुंभाराकडे कोणी फारसे लक्ष देतांना दिसत नाही. या कुंभार समाजाला कलेच्या बाबतीत अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. कोरोनाच्या ऑर्डर संकटामुळे ग्राहकांनी भितीपोटी गणेशमुर्तींच्या ऑर्डर देण्याकडे पाठ फिरविली आहे. तर या कलानगरामध्ये आधीच साकरण्यात आलेल्या पाच ते सात फुटापर्यंतच्या गणेश मुर्तींच्या शासनाच्या मर्यादेच्या उंचीच्या नियमावलीमुळे या मुर्ती कारखान्यात तशाच पडून राहिल्या आहेत. याचा येथील मुर्तीकारांना चांगलाच फटका बसला आहे. त्यातच भांडवला अभावी येथील कुंभार समाजाला हा व्यवसाय करण्यासाठी मोठी आर्थिक अडचण येत आहे. रंग, माती व इतर साहित्य यांच्या वाढत्या दरामुळे हा व्यवसाय भांडवळी स्वरूपाचा झाला आहे. कलेचा वारसा लाभल्यांमध्ये प्रसाद कलामंदिराचे मुर्तीकार गजानन चौलकर, प्रसाद चौलकर, अभिजित, कला रंगसंगतीचे नंदकुमार चिरनेरकर मुर्तीकार दामोदर चौलकर, भाई चौलकर, सुनिल चौलकर, संदेश चौलकर, रंगनाथ चौलकार, जगन्नाथ हातनोलकर, नारायण चौलकर, विजय चौलकर, नरेश हातनोलकर, विलास हातनोलकर, रघुनाथ हातनोलकर, प्रकाश चिरनेरकर, जिवन चौलकर, चेतन चौलकर, अमित चिरनेरकर, कुणाल चिरनेरकर, भालचंद्र हातनोलकर, रमेश म्हशिलकर यांच्या घराण्याचा मुर्ती कलेत नावलैकित आहे. दरवर्षी गणेश उत्सवात त्यांच्या कारखान्यात गणरायाची विविध रूपे पहावयास मिळतात. शासनाने पर्यावरणास हानिकारक असणार्या पीओपीच्या मुर्तीवर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या नियमावलीचे स्वागत करत चिरनेरच्या कलानगरमध्ये 80 टक्के गणेशमुर्ती या शाडू मातीपासूनच तयार केलेल्या पहावयास मिळतात असे विष्णू चौलकर, रामा चौलकर, नारायण चौलकर, व संतोष चौलकर यांनी सांगितले.
शाडू मातीच्या मुर्ती कलेचे चिरनेर हे माहेरघर समजल्या जाणार्या कलानगरात विविध भावरूपातील गणेशमुर्ती पहावयास मिळतात. अनेक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर इथल्या मुर्तींकारांनी या व्यवसायातून नाव कमावले आहे. चिरनेर कलानगर येथील गणेशमुर्तींची खासियत आहे.