Breaking News

‘कामोठे शहरातील सर्व व्यापार्यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या’

कामोठे : रामप्रहर वृत्त

कामोठे शहरातील सर्व व्यापारी व्यवसायिकांना दैनंदिन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप कामोठे तालुका मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी पनवेल महापालिका आयुक्तांनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदन दिले आहे.

निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, दुकाने उघडल्याशिवाय ज्यांचा व्यवसाय होवू शकत नाही असे दुकानदार तसेच वेगवेगळया पद्धतीच्या सेवा पुरवणार्‍या संस्था याठिकाणी काम करणार्‍या लोकांच्या रोजगारावरती या लॉकडाऊनचा अनिष्ट परिणाम जाणवू लागला आहे. सध्या स्थितीत 1 ऑगस्टपासून सम-विषम तारखेप्रमाणे छोटया-मोठया व्यापार्‍यांची दुकाने कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता चालु आहेत. व्यापार्‍यांच्या वतीने अर्जामध्ये म्हटले आहे की पुढे सम-विषम हा पर्याय न घेता दैनंदिन व्यवसाय करण्याची परवानगी दयावी.

दुकान सम-विषम नियमानुसार 15 दिवस चालु राहते, परंतु दुकान मालक पुर्ण महिन्याचे भाडे घेतो. त्याचबरोबर व्यापारी मंडळाना कामगारांचे पगार सुध्दा पुर्ण महिन्यांचा द्यावा लागतो. त्यामुळे व्यापारी मंडळाला मोठया आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे व्यापारी मंडळ कर्जात बुडत आहे. जर असेच काही दिवस चालत राहील्यास काही व्यापारी मंडळी टोकाची भुमिका घेऊन आत्महत्येस प्रवृत्त होतील. तरी दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी जे काही आपल्या कोरोना महामारी रोखण्यासाठी अटी, नियम असतील त्याचे सर्व व्यापारी मंडळ काटेकोर पणे पालन करतील अशी ग्वाही भाजप मंडळाच्या वतीने देण्यात आली.दैनंदिन दुकाने चालु ठेवण्याची 17 ऑगस्ट पुर्वी परवानगी द्यावी, अन्यथा व्यापारी मंडळा सोबत 17 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल व आंदोलनानंतर होणार्‍या परिणामाची सर्व जबाबदारी पुर्णपणे शासनाची राहील.

या निवेदनांचा विचार करून सर्व व्यापार मंडळाना दैनंदिन व्यावसायासाठी दकाने उघडण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी निवेदन देताना रवींद्र जोशी यांच्यासमवेत भाजप नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना मगदुम, पार्थ ठक्कर, संजय भुलारे, भवन ब्रासडीया, कैलास सरगर उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply