पनवेल : बातमीदार
पनवेल येथील आयएनआयएफडीतर्फे आकुर्ली येथील काकाजिनी वाडीत 4 मे रोजी मेगा फॅशन इव्हेंट रंगला होता. या इव्हेंटला फॅशन डिझायनर, सिनेकलाकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले, कॉमेडी अभिनेता अली असगर, सेलिब्रिटी डिझायनर सलमान खानची वैयक्तिक स्टाइलिस्ट अॅशले रेबेलो, अँकर दिनेझ अहुजा, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमल, नगरसेवक परेश ठाकूर, बॉलीवूड डिझायनर्स रिधी आणि सिद्धी मॅप्सेनकार, अभिनेता सिद्धार्थ बॅनर्जी, नगरसेवक राजश्री वावेकर, इंद्रपाल सिंह, उपाध्यक्ष राजर्षी एंटरटेनमेंट, नोरा ज्वेल्समधील पंकज असरानी यांची उपस्थिती लाभली. सोल सेन्सेशन 2.0 आयएनआयएफडी पनवेलने फॅशन आणि डिझाइनच्या जगात नवीन बेंचमार्क सेट केला आहे, याच धर्तीवर हा फॅशन शो सादर करण्यात आला. फॅशन आणि डिझाइनच्या जगातील परिपूर्ण मंच प्रदान करताना, आयएनआयएफडी पनवेलच्या सोल सेन्सेनेशन 2.0 20 अद्वितीय डिझायनर संग्रह केला. या शोमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात मदत झाली, तसेच विद्यार्थ्यांना स्वतःला आंतरराष्ट्रीय डिझाइनर म्हणून सादर करता आले. बेंचमार्क वाढावा आणि यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात मदत झाली आहे, असे आयएनआयएफडी पनवेलचे व्यवस्थापकीय संचालक सुरिंदर सिंह यांनी सांगितले. या वेळी येथील विद्यार्थ्यांनी स्वतःला आंतरराष्ट्रीय डिझाइनर म्हणून सादर केले. या फॅशन शोचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रचनांनी सूक्ष्म, उत्कृष्ट आणि शाही स्वरूप प्रदर्शित केले. पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त संध्या बावनकुळे यांनीदेखील रॅम्प वॉक करत उपस्थितांची मने जिंकली. आंतरराष्ट्रीय थीम आणि संकल्पनांसह फॅशनच्या यशाबद्दल बोलताना, आयएनआयएफडी पनवेलचे संचालक सुरिंदर सिंह म्हणाले की, गेल्या वर्षीच्या शोने जबरदस्त प्रतिक्रिया दिल्यामुळे आम्हाला खरोखरच अभिमान वाटला. त्यामुळे यंदाच्या या दुसर्या हंगामात पुन्हा एकदा आयएनआयएफडी पनवेलच्या तरुण विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट काम केले. यात आयएनआयएफडी पनवेलचा विद्यार्थी प्रयत्न यशस्वी झाला आहे. म्हणजे आम्ही सर्व यशस्वी झालो आहोत, असे त्यांनी शेवटी सांगितले.