Wednesday , June 7 2023
Breaking News

रिपाइं तालुका अध्यक्षपदी संजय गायकवाड

उरण ः प्रतिनिधी उरण येथील पूर्वीचे पँथरचे कार्यकर्ते संजय गायकवाड यांचे सामाजिक काम तसेच कामगार व सर्व थरातील श्रमिकवर्गात कामाचे संघटन कौशल्य पाहून केंद्रीय समाज कल्याण मंत्री, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा तथा कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या हस्ते संजय  गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)च्या उरण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने उरण तालुक्यातीळ सर्व थरातील लोकांत उत्साहाचे वातावरण आहे. याबद्दल माजी आमदार सुमंतराव गायकवाड, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रीय सरचिटणीस दयानंद बहादुरे, नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ, मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply