Breaking News

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रविवारी खोपोली, कर्जत व उरणमध्ये सभा

खोपोली : प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रविवारी (दि.30) खोपोलीत सभा आयोजित केली आहे.
समाज मंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील प्रांगणात दुपारी 3 वाजता या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते व आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत माहिती दिली. या बैठकीत या सभेच्या नियोजनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी काही कार्यकर्त्यांना उपयुक्त सूचना दिल्या. खोपोली, कर्जत व उरण या तिन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येक उमेदवारांनी आपल्या प्रभागातील कार्यकर्त्यांना सोबत आणण्याविषयी सूचना करण्यात आल्या. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे ती कार्यकर्त्यांनी पार पाडावी असेही या वेळी सांगण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार यांनी केले. या वेळी, खोपोली प्रभारी सुनील घरत, खोपोली शहर अध्यक्ष अजय इंगुलकर, महिला शहर अध्यक्ष अश्विनी अत्रे, यशवंत साबळे त्याचप्रमाणे खोपोली शहरातील पदाधिकारी, पनवेलचे मान्यवर नेते तसेच खोपोली शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, उरण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने भाजप महायुतीची विजयी निर्धार सभा रविवार (दि.30) नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ.नानासाहेब विष्णू धर्माधिकारी, उरण नगर परिषद मराठी शाळा प्ररांगांत आयोजित करण्यात आली आहे.
या सभेस भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार पनवेल विधानसभा प्रशांत ठाकूर, उरण आमदार विधानसभा महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी पनवेल नगराध्यक्ष तथा भाजपा ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे आदी विशेष मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Check Also

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …

Leave a Reply