पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील आशा की किरण या व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अल्लारखा (देवदूत) बशीर कुरेशी व सचिव नूरजहाँ कुरेशी यांच्या केंद्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्यामकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी कोकण डायरी या सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्राचे संपादक, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सय्यद अकबर व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक पत्रकार केवल महाडिक उपस्थित होते. त्याचप्रमाणे साई ब्लड बँक यांच्या वतीने जन आधार धर्मादायी संस्था व पनवेल ग्रामीण डॉक्टर वेल्फेअर असोसिएशन व एम. आर. फ्रेंड्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पनवेल येथील वाजे हायस्कुल येथे केले. या वेळी भगवान भगत, नितीन पाटील, नितीन भगत यांनी रक्तदात्यांना भेट दिली. तसेच आसूडगाव रस्त्यालगत राहणार्या गरीबांना केंद्राच्या वतीने अन्नदानही करण्यात आले.