Breaking News

ऐन सणासुदीतही विजेचा लपंडाव

मूर्तीकारांना घ्यावा लागतोय जनरेटरचा आधार

चिरनेर : वार्ताहर – ऐन सणासुदीच्या म्हणजे गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून, ठेपला असून श्री गणरायाची मुर्ती घडविणारे मूर्तीकार सध्या रंगसंगतीच्या कामात गुंतले आहेत. त्यांना स्प्रेद्वारे शेडींगचे रंगकाम करतांना विजे विना मोठी समस्या निर्माण होत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने येथील मूर्तीकारांना नाहक भाड्याच्या जनरेटरचा आधार घ्यावा लागला असून, येथील गणेशमुर्ती कारखानदांराना जनरेटच्या भाड्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. मुर्तीकारांचे रंगरंगोटीचे महत्वपूर्ण काम अगदी हातघाईवर आले असून, त्यांना हे असे लंपडाव खेळणारे विजेचे विघ्न त्रासदायक ठरत असल्याचे चित्र सध्या चिरनेर कलानगर येथे पहावयास मिळत आहे.

महावितरण कंपनीने गणेश उत्सवात तरी हा भोंगळ कारभार सुधारावा, अशी मागणी येथील मुर्तीकार नंदकुमार चिरनेरकर, भाई चौलकर, रंगनाथ चौलकर, गजानन चौलकर, दामोदर चौलकर, संदेश चौलकर, सुनील चौलकर, प्रसाद चौलकर, विलास चौलकर, नारायण चौलकर, विष्णू चौलकर, प्रकाश चिरनेरकर, कुणाल चिरनेरकर, विजय चौलकर, राम चौलकर, नरेश हातनोलकर, जीवन चौलकर, अमीत चिरनेरकर व अभिजित चिरनेरकर, यांनी चिरनेर येथील महावितरण कंपनीकडे केली असून संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा या मुर्तीकारांनी प्रयत्न केला मात्र फोन स्विच ऑफ असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

पावसाळयापूर्वी विजेची दुरूस्ती करून देखील, वारंवार वीज खंडीत का होते? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यावरून वीजपुरवठा खंडीत होण्यामागे अधिकारी वर्गाचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. गणपती उत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलेला असतांना, चिरनेरच्या कालानगरमधील गणपती कारखान्यांमध्ये युध्दपातळीवर काम सुरू आहे. मात्र या विजेच्या लपंडावामुळे गणपती उद्योजक खुप संतापलेले आहेत. त्यात अधिकारी वर्ग ग्राहकांना उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply