Breaking News

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

उरण : वार्ताहर – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने नगर परिषद येथील सभागृहात रविवारी (दि. 16) अभिवादन करण्यात आले. या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शहा, रायगड जिल्हा ओबीसी सेल उत्तर रायगड अध्यक्ष चंद्रकांत घरत, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, दीपक भोईर, नगरसेवक नंदू लांबे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply