Breaking News

18 ते 44 वयोगटातील लसीकरणाचे सत्र सायंकाळी सहा वाजता होणार प्रसिध्द

पनवेल : प्रतिनिधी

शासनाच्या निर्देशानुसार 1 मे 2021 रोजी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. या तीन केंद्रावर केवळ ऑनलाइन अपॉइंटमेंट निश्चित करणार्‍या व्यक्तींना लसीकरण केले जाते. या लसीकरणासाठी महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागातून लसीकरण सेशन प्रसिद्ध केले जातात. यापुढे दिनांक 4 मे 2021 पासून हे लसीकरण सेशन सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केले जातील याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

लसीकरण सेशन प्रसिद्ध केल्यानंतर काही मिनिटातच सर्व अपॉइंटमेंट निश्चित होतात. आजपर्यंत हे लसीकरण सेशन सायंकाळी 8 वाजता प्रसिद्ध केले जात होते. मंगळवार 4 मे 2021 पासून हे लसीकरण सेशन सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केले जातील याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच केवळ ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतलेल्या व्यक्तींनाच लसीकरण केले जाणार असल्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. सध्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी  ही लस उपलब्ध करून दिली असून प्रत्येक केंद्रावर 200 व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. जोपर्यंत पुरविण्यात आलेला साठा उपलब्ध आहे तोपर्यंत हे लसीकरण चालू राहील. भविष्यात जसा लसींचा साठा उपलब्ध होईल त्या प्रमाणात दररोज सेशन निर्माण करणे किंवा केंद्र संख्येमध्ये वाढ किंवा घट करणे याबाबत कार्यवाही केली जाईल.

त्यामुळे लसीकरणाची अपॉइंटमेंट निश्चित करण्यासाठी उजथखछ किंवा अठजॠधअ डएढण अ‍ॅपवर नोंदणी करून सायंकाळी 6 वाजता अपॉइंटमेंट निश्चित करून घेण्यासाठी  नागरिकांनी प्रयत्न करावेत.

अपॉइंटमेंट घेतलेल्या व्यक्तींनी निश्चित केलेल्या वेळेत संबंधित केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. इतरांनी या केंद्रावर विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

लसीकरण केंद्रांची नावे

1. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 1, गावदेवी पनवेल.

2. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 3, भाटिया हायस्कूल जवळ, नवीन पनवेल.

3. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 5, आयप्पा मंदिर जवळ, सेक्टर 15, खारघर.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply