Breaking News

जेएनपीटीमध्ये वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र सुरू

उरण ः वार्ताहर

भारताचे प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) पर्यावरणासंबंधी उद्दिष्ट प्राप्ती व हरित बंदर बनण्याच्या दृष्टीने पोर्ट ऑपरेशन सेंटर येथे ’सतत वातावरणीय वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र’ (सीएएक्यूएमएस) सुरू केले आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, भा. प्र. से.  यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. या वेळी पोर्टचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, भा. रा. से, सीव्हीओ ए. एस. रामटेके (आयआरआरएस), आयआयटी मद्रासचे प्रोफेसर प्रा. शिवा नागेंद्र आणि जेएनपीटीचे विभागाध्यक्ष उपस्थित होते.

नुकत्याच सुरू झालेल्या या केंद्रामध्ये (सीएएक्यूएमएस स्टेशन) पार्टिक्युलेट मॅटर (10 आणि 2.5), सल्फर डायऑक्साइड (एसओ 2), नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ 2), अमोनिया (एनएच 3), ओझोन, कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डाइऑक्साइड और वोलटाइल ओरगॅनिक कंपाऊंड्स यांसारख्या रिअल टाईम एअर क्वालिटी पॅरामीटर्सचे निरीक्षण केले जाईल. याशिवाय तापमान, पाऊस, हवेतील आद्रता, सौर किरणे, वार्‍याचा वेग व  दिशा यांसारख्या हवामानाशी निगडित सहा पॅरामीटर्सचेदेखील या केंद्रामध्ये निरीक्षण केले जाईल. या केंद्रामध्ये रिअल-टाइम सतत वायू गुणवत्ता माहितीदेखील एकत्रित केली जाईल, जी मोठ्या स्क्रीनद्वारे लोकांना दाखविण्यात येईल तसेच सामान्य लोकांना ही माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ही माहिती जेएनपीटीच्या वेबसाइटवरही प्रदर्शित केली जाईल.

बंदरातील वास्तविक वायू गुणवत्तेची स्थिती जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या या सतत वातावरणीय वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राचे संचालन व देखभाल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासद्वारे केले जाईल. जेएनपीटीमध्ये राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकानुसार (नॅशनल एम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड) हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले जात आहे आणि बंदरातील अनेक ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेची स्वयंचालित माहिती उपलब्ध होण्यासाठी सेंसर आधारित हवा गुणवत्ता निरीक्षण उपकरणे बसविण्यात आली आहेत. या नवीन प्रणालीमुळे जेएनपीटीस सस्टेनेबल ग्लोबल बंदरांच्या समतुल्य बनण्यास व जगातील अग्रगण्य कंटेनर बंदरांमध्ये वरच्या स्थानावर पोहचण्यास मदत होईल.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply