Breaking News

परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप महायुतीच्या पनवेलमधील वडघर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सोनाली जितेकर आणि वडघर पंचायत समिती गणाच्या उमेदवार रंजना वास्कर यांच्या प्रचारार्थ रविवारी वडघर मुस्लिम मोहल्ला येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परिसराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा अधोरेखित केला. भाजपच्या माध्यमातूनच या भागाचा कायापालट होत असल्याचे सांगत येणार्‍या काळात विकासाची ही गती कायम राखण्यासाठी कमळ निशाणीसमोरील बटन दाबून भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार महेश बालदी यांनीदेखील मतदारांशी संवाद साधताना विकासाच्या राजकारणावर भर दिला. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ विकासासाठी भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. जनतेच्या प्रगतीसाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
या प्रचार सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजप पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, शब्बीर कल्याणकर, बूथ अध्यक्ष मोहम्मद साठी, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष समीना साठी यांच्यासह मजीद निगुडकर, अ‍ॅड.मेहबुब पटेल, मैनुद्दीन मानुल्ला, माजी सदस्य बशीर खान, रमेश ठाकूर, किशोर ठाकूर, अस्मल चोगले, गाव अध्यक्ष अनवर राऊत, अरबाज साठी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील अवकाळी पाऊस, …

Leave a Reply