मुंबई : राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही, पण प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे. लालपरी सुरू झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रूळावर येण्यास मदत होणार आहे.
कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे 113 दिवसांच्या कालावधीत एसटीच्या इतिहासात प्रथमच 2300 कोटींचा महसूल बुडाला, परंतु आता जिल्हाबंदी राज्य शासनाने उठवली आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …