मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी हद्दीत असलेल्या कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा मुकेश परशुराम पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची निवड ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. या वेळी उपसरपंचपदासाठी यशश्री योगेश मुरकुटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
निवडणुक अधिकारी म्हणून ग्रामसेवक संदिप धारणे यांनी काम पाहिले तर सरपंच भारती चितले यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदी यशश्री मुरकुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे, माजी सरपंच विजय मुरकुटे, शैलेश म्हात्रे, भाजप तालुका उपाध्यक्ष ऍड. संजय टेंबे, केळवणे विभागीय अध्यक्ष माजी सरपंच किरण माळी, माजी उपसरपंच रविंद्र चितळे, माजी उपसरपंच भानूदास माळी, माजी उपसरपंच प्रकाश माळी, ग्रामपंचायत सदस्या मिनल ठोंबरे, नलिनी कारंदे, प्रमिला पाटील, केळवणे भाजप जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सामाजिक कार्यकर्ते दशरथ गायकर, जनार्दन महाडिक, शिक्षक मंदार वेदक, राजेश सोनावणे, बंडू मोडक, बाला क्रिडावकर, बाला चोरघे, विनायक गायकवाड, अमित पाटील, राजेश कारंदे, विशाल मुरकुटे, मयुर मुरकुटे, संदिप पाटील, धनाजी ठोंबरे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी कोरोनाचे भान ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले. कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी यशश्री मुरकुटे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.