Breaking News

हापूस आंब्याच्या उत्पादनात घट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

वातावरणातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने यंदा हंगामाच्या सुरुवातीस हापूस उत्पादनात घट नोंदवण्यात आली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात त्यात वाढ होण्याची आशा आहे. यामुळे हापूसची चव चाखण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मार्च महिन्यात हापूसचे उत्पादन सुमारे 30 ते 40 टक्केयांनी कमी झाले असून, एप्रिलमध्ये ते वाढण्याची अपेक्षा आहे, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ते कमीच राहील, अशी भीती प्रसिद्ध बागायतदार प्रसन्न पेठे यांनी व्यक्त केली. मे महिन्यात आंब्याचे प्रमाण वाढण्याची आशा आहे. सध्या कोकणातून हापूसपेट्या वाशीच्या घाऊक बाजारात येऊ लागल्या आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा 15 एप्रिल ते 20 मे या कालावधीतच हापूस जास्त प्रमाणात दाखल होईल, असे मत घाऊक फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले. सध्या बाजारात हापूसची आवक वाढत असली तरी आंब्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे. थ्रिप्स, तुडतुड्या या रोगांमुळे ही स्थिती आहे. गेल्या वर्षी घाऊक बाजारात चार ते सहा डझनाला चार ते सात हजार रुपये मोजावे लागत होते. यंदा फेब्रुवारीत हापूसच्या पेटीला दीड हजार ते 3500 रुपये दर मिळाला. आता हा दर दोन ते साडेतीन हजारांपर्यंतच आहे.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

खारघर : रामप्रहर वृत्तखारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत बास्केटबॉल स्पर्धेचेआयोजन करून करण्यात आले.तरुण …

Leave a Reply