खारघर : रामप्रहर वृत्त – कोरोना पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिबांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.
या अनुषंगाने धामोळे कातकरी वाडी, आणि खुटूक बांधण कातकरीवाडी येथील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती ‘अ’चे सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, वॉर्ड क्र.4चे अध्यक्ष वासुदेव पाटील, खारघर-तळोजा मंडळ अध्यक्ष विनोद घरत, रितेश रघुराज, रोशन घरत आदी उपस्थित होते.