Breaking News

रायगड जिल्ह्यात 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 212 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 24) 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 212 नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे 392 जण दिवसभरात बरे झाले आहेत.
मृत रुग्णांमध्ये पनवेल व खालापूर तालुक्यातील प्रत्येकी चार, अलिबाग तीन आणि कर्जत, पेण, रोहा, सुधागड व  श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल तालुक्यात 134, रोहा 24, अलिबाग 20, खालापूर 11, तळा पाच, सुधागड व महाड प्रत्येकी चार, कर्जत तीन, उरण, पेण व मुरूड प्रत्येकी दोन आणि श्रीवर्धन तालुक्यात एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 24,442 व मृतांची संख्या 724 झाली आहे. जिल्ह्यात 20,555 जण कोरोनामुक्त झाल्याने 3163 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply